आमच्या मळ्यातली ताजी भाजी आहे ही

एक तरूण पहिल्यांदा सासुरवाडी ला जातो. तिथे त्यांचे स्वागतही मस्त होते. पण दुपारी जेवणात त्याला न आवडणारी “मेथी”ची भाजी असते. पहिलाच दिवस, म्हणू बिचारा गुपचुप खातो… सासूबाई वरून कौतुकाने सांगतात… “आमच्या मळ्यातली ताजी भाजी आहे ही.”…!! रात्री पुन्हा जेवणात पाहतो तर काय… मेथीचे पिठले..!! एकदा पत्नीकडे पाहत… गपगुमान गिळतो. दुसर्‍या दिवशी दुपारी पुन्हा मेथीचे वरण…!!