Maharashtra Election Exit Poll

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान पूर्ण होताच विविध एक्झिट पोल्सचे अंदाज बाहेर येऊ लागले आहे. एबीपी माझा-नेसल्सनं  दुपारी तीन वाजेपर्यंतच्या मतादानाच्या आधारे कुठल्याही पक्षाला पूर्ण बहुमत न मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याच पाठोपाठ आता सी वोटर-टाईम्स तसंच टुडे-चाणक्य आणि इतर संस्थाचेही एक्झिट पोल समोर आले आहेत.

 

एबीपी माझा- नेल्सन पोल :

नेल्सनच्या आज दुपारी तीन वाजेपर्यंतच्या पोलनुसार भाजपला 127, शिवसेना- 77, काँग्रेस-40, राष्ट्रवादी-34 आणि मनसेला पाच जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. तर अपक्षांचा वाट पाच जागांचा असेल अशीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.     

 

सी वोटर-टाईम्स एक्झिट पोल : 

टाईम्स गृप आणि सी वोट यांनी केलेल्या एक्झिट पोलमध्येही भाजप हाच सर्वात मोठा पक्ष असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर त्यापाठोपाठ शिवसेना स्थान मिळत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

सी वोटरच्या सर्व्हेनुसार भाजप-129, शिवसेना- 56, काँग्रेस-43, राष्ट्रवादी-36 आणि मनसेला 12 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर अपक्षांना देखील 12 जागांवर विजय मिळेल असा अंदाज सी वोटरनं व्यक्त केला आहे.

  

टुडेज चाणक्य एक्झिट पोल :

मतदान पूर्ण होताच टुडेज चाणक्यनं देखील एक्झिट पोल देण्यास सुरुवात केली आहे.

 

चाणक्यनं भाजप- 151, शिवसेना-71 , काँग्रेस- 27 , राष्ट्रवादी – 28 तर मनसे आणि इतरांना- 11 जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

महाराष्ट्रातील मतदारांचा कौल घेण्यासाठी चाणक्यनं काही प्रश्नांच्या माध्यमातून सर्व्हे केला आहे.

 

प्रश्न- मोदी लाट अजुनही महाराष्ट्रात कायम आहे आणि त्यातून महाराष्ट्र सत्ता परिवर्तन असं तुम्हाला वाटतं?

यावर तब्बल 36 टक्के मतदारांनी मोदी लाट कायम असल्याचं सांगितलं आहे. तर 29 टक्के मतदारांनी मोदींचा परिणान होणार नसल्याच्या बाजुनं कौल दिला आहे.

 

प्रश्न : तुम्हाला महाराष्ट्र सत्ता परिवर्तन व्हालं असं वाटतं का?

या प्रश्नावर तब्बल 65 लोकांना होकारार्थी म्हणजे सत्ता परिवर्तनाची इच्छा व्यक्त केल्याचं सर्व्हेत सांगण्यात आलं आहे. तर 28 टक्के लोक हे सत्ता परिवर्तनाच्या विरोधात म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाच्या बाजुनं असल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे.

 

इंडिया न्यूज :

इंडिया न्यूजनं केलेल्या एक्झिट पोलमधून पुन्हा एकदा भाजपच्या बाजुनं कौल देण्यात आला आहे. या पोलनुसार देखील कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नसलं तरी, भाजप हाच सर्वात मोठा पक्ष बनेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

भाजप – 103, शिवसेना-88, काँग्रेस-45, राष्ट्रवादी-35, मनसे-3 आणि अपक्षांना 14 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

 

टीव्ही-9 चा एक्झिट पोल :

टीव्ही 9 गृपच्या एक्झिट पोलमध्ये भाजप- 98-110, शिवसेना-84-93, काँग्रेस-43-48, राष्ट्रवादी-33-38 मनसे-3 आणि अपक्षा आणि इतरांना 10 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

त्यामुळं सद्यस्थितीत मतदानोत्तर एक्झिट पोल्समधून भाजपचा जनाधार वाढल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे. पण, मतदारांनी आपला निर्णय मतदान यंत्रात बंद केल्यानं त्यांच्या मनातील खरा कौल हा 19 ऑक्टोबर नंतरचा स्पष्ट होणार आहे.