ख़ास मासे खाणाऱ्यांसाठी

नक्की वाचा :
ख़ास मासे खाणाऱ्यांसाठी…..!!!
———————————————-
स्पेशल :

मासे खरेदी संबंधित काही महत्वाच्या टिप्स :

कोणत्याही प्रकारचे मासे घेताना घट्ट बघून घ्यावेत.
मासे बोटाने दाबल्यास खड्डा पडला तर तर ते शिळे, खराब समजावेत.

• पापलेट :
—————-
रंगाने सफेद व चमकदार दिसणारी पापलेट ताजी असतात.
पापलेट घेताना त्यांच्या डोळ्याखालील भाग दाबून पाहावा. सफेद पाणी आल्यास ती ताजी असतात, लाल पाणी आल्यास ती पापलेट शिळी असतात.तसेच पापलेट शिळी व खराब होत आल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो.

• भिंगी, सुरमई, रावस, कारली, हलवा :
———————————————-
विकत घेण्यापूर्वी घट्ट बघून घ्यावे.
माशाचे तोंड उघडून पाहिल्यास लालसर भाग दिसल्यास मासे ताजे समजावेत व काळसर दिसल्यास मासे शिळे व खराब समजावेत.

• कोलंबी :
—————
कोलंबी लाल व पांढरी अशी दोन प्रकारची येते.
•लाल कोलंबी : लाल कोलंबी मध्ये काळसर लाल व पांढर्या हिरवट रंगाची
लाल कोलंबी ताजी असते. हि कोलंबी रंगाने ऑरेंज कलरची होऊ लागली कि ती शिळी व खराब झाली असे समजावे.
तसेच शिळ्या व खराब कोलंबीची डोकी तुटलेली असतात.
ताजी कोलंबी घट्ट व कडक सालीची असते.
शिळ्या व खराब कोलंबीचे साल मऊ पडलेले असते व घाण वास येतो.
•पांढरी कोलंबी : पांढरी कोलंबी पचायला हलकी व जास्त चांगली असते.
पांढरी कोलंबी हि पांढर्या स्वच्छ रंगाची, घट्ट व चमकदार असते.
पांढर्या कोलंबीत जर पिवळसर काळा रंग येऊ लागला
तर ती शिळी व खराब होत आली आहे असे समजावे.
तसेच कोलंबीची डोकी तुटू लागलेली व डोक्याला काळा रंग येऊ लागलेली
व साल मऊ पडलेली कोलंबी शिळी व खराब झालेली असते. ती घेऊ नये.

• करंदी :
————-
तांबूस सफेद रंगाची व घट्ट सालीची करंदी ताजी असते.

• बांगडे :
———–
काळसर सफेद रंगाचे चमकदार व घट्ट बांगडे ताजे असतात.
तोंड उघडून पाहिल्यास लालसर रंग दिसणारे बांगडे ताजे असतात.
बांगडे शिळे व खराब झाल्यास त्याना पिवळसर रंग येऊ लागतो व मऊ पडतात दाबल्यास खड्डा पडतो.

• बोंबील :
————–
ताजे बोंबील पांढऱ्या स्वच्छ रंगाचे, घट्ट व चमकदार दिसतात.त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो.
बोंबील खराब होत आले कि त्याना पिवळसर रंग येऊ लागतो.

• मुडदुशा (रेणवे) :
—————————
पांढऱ्या स्वच्छ व चमकदार दिसणाऱ्या  मुडदुशा ताज्या असतात.
त्यांच्या तोंडाच्या आतील भाग लाल असतो.
मुडदुशा शिळ्या व खराब झाल्या कि त्याना पिवळसर रंग येतो व त्या मऊ पडतात.

• मांदेली :
————-
पिवळसर सोनेरी रंगाची, घट्ट व तोंडाच्या आतील भाग लाल असलेली
मांदेली ताजी असतात.मांदेली शिळी व खराब होऊ लागली कि तिला ऑरेंज रंग येऊ लागतो व त्या मऊ पडतात.

• बोय :
———–
काळसर चमकदार रंगाची व घट्ट बोय ताजी असते.जास्त मोठी बोय चवीला उग्र असते व हिरमुस वास असतो.

• शेवंड (Lobster ), खाडीची मोठी कोलंबी :
——————————————————–
शेवंड व खाडीची मोठी कोलंबी विकत घेताना
घट्ट, कडक सालीची बघून व ताजी बघून घ्यावी.

• ओला जवळा :
———————–
ओला जवळा घेताना  पांढऱ्या स्वच्छ रंगाचा ताजा घ्यावा.

• शिंपल्या (तिसर्या) :
—————————–
शिपल्या घेताना काळसर रंगाच्या व तोंड मिटलेल्या घ्याव्यात, किंवा जिवंत असणाऱ्या, तोंडे उघडझाप करणाऱ्या  घ्याव्यात.
शिपल्या खराब व शिळ्या झाल्या कि त्यांची तोंडे उघडी पडलेली असतात मिटत नाहीत.

• कालवे :
————–
कालवे घेताना पाढर्या रंगाची, मोठी व ताजी पाण्यात ठेवलेली घ्यावीत.
छोटी कालवे साफ करायला व आतील खडकाची कच काढायला त्रास होतो व कचही जास्त असते. मोठी कालवे पटकन साफ करता येतात.

• चिंबोरी (खेकडे/ Crab) :
———————————–
चिंबोऱ्या  घेताना काळसर रंगाच्या, जिवंत व चालणार्या बघून घ्याव्यात.
खेकडे घेताना खेकड्याची पाठ दाबून पहावी. पाठ कडक असल्यास खेकडे आतून मांसाने भरलेले असतात. जर खेकड्याची पाठ दबली गेल्यास खेकडे आतून पोकळ असतात व खायाला काही मिळत नाही
तसेच अमावास्येला खेकडे मांसाने भरलेले असतात
व पौर्णिमेला आतून पोकळ असतात असे म्हणतात.

• भक्तांनो, या अमुल्य माहितीची पुरेपुर आनंद घ्यावा…!