बाळाला जन्म दिल्यावर वडिलांसह प्रत्येकजण विचारतो

बाळाला जन्म दिल्यावर वडिलांसह
प्रत्येकजण
विचारतो ,”मुलगा की मुलगी?”
फक्त आईच विचारते,
“माझं बाळ कसं आहे?”
तिला प्रश्न पडत नाही,
“मुलगा की मुलगी?”
म्हणून तर ती आई असते ..



परवा एक मित्र भेटला.. खूप दिवसांनी.


घट्ट मिठी, हातात हात, खूप आठवणी.. खूप गप्पा..
मी सहजच विचारलं –
“आई कशी आहे रे?” क्षणांत डोळे भरले त्याचे… आणि म्हणाला –
“आई माझ्याकडे नसते रे हल्ली.. गेली दोन वर्ष
वृद्धाश्रमातच आहे… आजच वाढदिवसाला भेटून आलो तिला.”

त्यानं मला विचारलं –
“तुझी आई तुझ्याकडेच असते ना?” मी म्हणालो-
“देवाची कृपा आहे. मला आईपेक्षा मोठं नाही केलं त्याने.
आई माझ्याकडे नसते… मीच आईकडे राहतोय…
….जन्मापासून”

आवडलं तर नक्की शेअर करा


Comments

comments

Comments are closed.