देवाची कैफीयत marathi poem

देवाची कैफीयत..

ताेच ताेच नारळ
तिच तिच केळी..
दाखवाना कधीतरी
मलाही स्टृाॅबेरी  ॥

तेच तेच भजन
तिच तिच आरती..
ऐकवाना कधीतरी
सिलाेन विविध भारती ॥

साेडारे मलाही
थाेडा वेळ माेकळा..
खाऊद्याना मलाही
मस्त गुजराती ढाेकळा ॥

ऐवढ्या माेठ्या गाभाय्रात
कुबट तेलकट वास..
गुदमरताे रे माझाही
सारखा इथं श्वास ॥

चांदी साेन्यानं मढवलं
तेंव्हाच हाेताे घाबरलाे..
टाळं ठाेकायच्या आत
धुम ठाेकून पळालाे  ॥

शाेधताेस पत्ता माझा
मी तर अंगणात इथे..
शाेधताेस दगडात वेड्या
नव्हताेच मी कधी तिथे ॥