आमच्या मळ्यातली ताजी भाजी आहे ही

एक तरूण पहिल्यांदा सासुरवाडी ला जातो. तिथे त्यांचे स्वागतही मस्त होते.
पण दुपारी जेवणात त्याला न आवडणारी “मेथी”ची भाजी असते.
पहिलाच दिवस, म्हणू बिचारा गुपचुप खातो…
सासूबाई वरून कौतुकाने सांगतात…
“आमच्या मळ्यातली ताजी भाजी आहे ही.”…!!
रात्री पुन्हा जेवणात पाहतो तर काय… मेथीचे पिठले..!!
एकदा पत्नीकडे पाहत… गपगुमान गिळतो.
दुसर्‍या दिवशी दुपारी पुन्हा मेथीचे वरण…!!
आता मात्र आपल्या cute बायको कड़े पाहून  बिचारा संयम बाळगतो.
सायंकाळी मात्र तो स्वतःच सासू बाईना सांगतॊ…
“रात्रीचा माझा स्वयंपाक करू नका….!”

तुमचा तो मेथीचा मळा कुठे आहे तेवढं सांगा…
.
.
.
.
.
.
.
.
.
मीच तिथे जाऊन “चरून” येतो…..
😆😆😆😆